नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही खास अश्या विरह कविता ज्या की तुम्हाला नक्की आवडती. Virah दुरावा नेहमीच त्रास दायक असतोच. आपल्या प्रियकरापासून दूर राहण खूप अवघड असत आणि हे भाव व्यक्त करण्यासाठी कविता हे खूप भारी माध्यम आहे. आम्ही अश्याच कविता आपल्या साठी घेऊन आलो आहे ज्या की मराठी कवींनी लिहल्या आहेत.
आम्ही सर्व कविता वेग वेगळ्या माध्यमातून गोळा केल्या आहेत तरी आपण या गोष्टी ची नोंद घ्यावी. तुम्ही जर या कवितेचे लेखक असाल आणि जर तुम्हाला ही कविता इथून हटवायची असेल तर आम्हाला कमेन्ट द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर तुमची कविता इथून हटवू. जरी तुम्हाला कविता पाठवायची असेल तरी देखील तुम्ही आम्हाला पाठऊ शकता
विरह
आता परत नाही जायचे त्या शहरात जिथे आपलं मन रमत नाही,
तु रहा नेहमी खुश पण मला तुझ्याशिवाय जमत नाही,
जिच्यासाठी सोडली साथ माझी राहो नेहमी जोडी तिची तुझी,
आता राहील ना आयुष्यात तुझ्या परत ना ये जीवनात माझ्या
माझी साथ सोडली तशी नको सोडू तिची नाहीतर स्वप्न राहतील अपूर्ण तुझ्या आयुष्याची
नवी सुरुवात नव्या जीवनाची धडपड फक्त स्वतःसाठी जगण्याची
आता ना कोणासाठी झुरण्याची ओढ फक्त आता आनंदी राहण्याची
-Wr.Pallavi
https://www.youtube.com/watch?v=n8SvyHA6tdw
कवि मन पुन्हा जागी झालं
कवि मन पुन्हा जागी झालं पुन्हा कविता करायला लागलं पूर्वी प्रेम कविता करू लागलेलं आता विरह गीत लिहायला लागलं,
याला सर्वस्वी मीच जबाबदार मग कोणावर रागे भरणार रागे भरण्याचा पूर्ण अधिकारतिचाच तर असणार
कवितांचा मीच गीतकार मीच श्रोता असणार एकदा तरी माझी कविता वाचणारं माझ प्रेम पुन्हा डोकावणार?
-स्वरचित सुनीत Sonnet
🌸🌸🌸🌸🌸🌸
भान
भान हरवायला काही नाही…समोर आल्यावर तू,मी भानावर असले पाहिजे…
डोळ्यात डोळे टाकून तुझ्या,मला बघता यायला पाहिजे…
ओठांत दाटून आलेलं शब्द,तुझ्यासमोर व्यक्त करता आले पाहिजे…
ओसरलेला स्पर्श तुझा,मला अनुभवता आला पाहिजे…
नवखी नाही मी,पण तुला मला ओळखता आलं पाहिजे…
भान हरवायला काही नाही,पण तुझ्यासमोर मला भानावर राहता आलं पाहिजे….
-swapn_prem_vedi
🌸🌸🌸🌸🌸🌸
झुरणं
जगायचं म्हणून जगतेय या जगण्याला काय अर्थ आहे,
नुसतेच भाळणे तुझ्यावर या भाळण्याला कोणते नाव आहे,
तुझं वावरणं साऱ्यात असतं माझी फक्त सावली सोबत आहे,
बहरत जावं आयुष्य तुझं माझं आयुष्य मला तुझ्यात दिसते आहे,
अपेक्षा नसतेच भावनेला भावनाहीन झुरणं किती कठीण आहे…
@swapn_prem_vedi ❣️
🌸🌸🌸🌸🌸🌸
A post shared by स्वप्न_प्रेम_वेडी🥀 (@swapn_prem_vedi)
कोण्या देवाची शप्पथ घालू तूच सांग, कोण्या वळणावर मी तुझी वाट नाही बघितली तूच सांग,रिकामे होते आयुष्य सारे तुझ्या येण्याने ते पूर्ण झाले, कोण्या भाषेत तुला समजावून सांगू तूच सांग …!-लिना
🌸🌸🌸🌸🌸🌸
मनातलं सर्व माझ्या तिला केव्हापासून सांगायचं होतं सांगताच ती लाजून म्हणाली मला तर आधीच माहीत होतं.
🌸🌸🌸🌸🌸🌸
कोरे ठेऊन पान मनाचेआठवणीत का बोलतेसबंद दरवाजे मिलनाचेस्वप्नातच का भेटतेस.
🌸🌸🌸🌸🌸🌸
अश्रू फुले विरहाची
विरहात रात्र रात्रसरली आठवणीतकधीकाळी होता एकप्रियकर तो मनात…शपथ घेतली होतीकधी भावी मिलनाचीमार्गच आता चुकलादोर तुटली भाग्याची…शांत त्या सागरतीरीकाढले नाव वाळूतकिना-याला यावी लाटगेले घेऊन ते आत…बाग ती बहरलेलीराघू-मैना त्यात होतेआता एकटीच मैनाविरहाचे गीत गाते…संकटे असावी तिथेसाथ असता दोघांचीईश्वरा नसावी अशी“अश्रू फुले विरहाची”श्री सुरेश शिर्केखारघर,पनवेल
🌸🌸🌸🌸🌸🌸
सांगायचे होते तुजलाखेळ ते विरहाचे होतेक्षणात नाते आपलेविलग झाले होते.
🌸🌸🌸🌸🌸🌸
टिक टिक घड्याळाचीकरिते क्षणांस जाचक,होत नाही महन ते एकटेपण,आठवणींच्या दुनियेत रमून,होते भूतकाळाचे चित्रीकरणनयन मिटताच….ते रूप तुझे,तो सहवासतुझा,ते दुःख तुझे,ती काळजी तुझी,जणू भासते ती व्हावीआत्ताच परिधान,पण अणूंचा गोंधळ माजुन वाहतोथेंबांचा प्रवाह नयन उघडताच…
🌸🌸🌸🌸🌸🌸
मनाच्या खोल कुठेतरीविचारांचं खळबळ माजलयं…विरहाचं धुकं नात्यात दाटलयंअश्रू आतुर आहेत वाहण्यासाठीतुला दिलेल्या एका वचनापायीगालांवरच्या खोट्या हास्यातमी त्यांना अडवलंय.
🌸🌸🌸🌸🌸🌸
तुझी मिठी म्हणजेचंद्र चांदण्यांचा भासमिलन ह्रदयाचा व्हावंएकत्र येऊन तुझा-माझा श्वास..
🌸🌸🌸🌸🌸🌸
काय सांगू
काय सांगू
त्या जुन्या आठवणीं कवटाळून जगतो आहेहसऱ्या चेहऱ्याच्या मागेखरा चेहरा लपवतो आहेएक स्वर तुझा पडावा कानी म्हणून झुरतो आहेमला तू दिलेला प्रत्येक आवाज मजला आजही वाटतो कोकिळे समान
त्या सुमधुर आवाजसमी पोरका झालोमाझीच ती चूक हाती कोणास दुसने देनारत्याची शिक्षा फार भोगलीमाफी मागण्याची सोयच नाही
तुझ नाव कानी पडताचनजर स्वैरभैर न्याहळते चेहरे त्या चेहऱ्याआड दुसऱ्याचाचेहरा पाहून मन खिन्नपुनः नव्या दमाने नाव तुझं ऐकण्या मनात हुरहूर
काय सांगू त्या जुन्या आठवणीं कवटाळून जगतो आहेहसऱ्या चेहऱ्याच्या मागेखरा चेहरा लपवतो आहेएक स्वर तुझा पडावाकानी म्हणून झुरतो आहे
-स्वरचितसुनीत Sonnet
🌸🌸🌸🌸🌸🌸
घटका विरहाची भरलीविरहाची सांगता होत आहेतुझ्या माझ्या प्रेमाचा बंधनव्याने एक होत आहे.
🌸🌸🌸🌸🌸🌸
आता तरी होशील का माझी…तुला राणी माझी बनवीन
एकांतात शांत बसला असतानतुझी प्रतीमा आली डोळ्या समोरूनतुझ्यात मी सारं गेलो हरवूनस्वतःला सारं बसलो विसरून ||
तुझे नी माझे दोन मन मिळूनएकच विचार सदा घडवून शब्दांचा खेळ सारा रंगवूनशब्द मनात जातात खोलवर रूजून ||
तुझ्या आठवणीने सार मन जातं फुलूनकधी हसवून तर कधी जात हरवूनतुझ्या गजऱ्याचा सुगंध जातो दरवळूनराणी तुझ रूप दिसत फुलून ||
तुझ्या एका भेटीसाठी आतूर मि होईनही एक भेट गाठ यावी घडून तुझे ते रूप गोजिरे डोळे भरून पाहिनतुझ्या भेटीचे ते सारे क्षण ठेवीन साठवून || कवी:- हरिष नैताम
🌸🌸🌸🌸🌸🌸
तिच्या सैलसर मिठीत जेव्हा माझेपण वितळत होते तिच्या साऱ्या मौनांचे जणूमज भाषांतर उमगत होते
रात्र सरली कळत नकळत निःशब्द मोगऱ्याचा दरवळकेवढे तिला सांगायचे असतेस्पर्शात उमगली हिरवळ
© संदीप राऊत
🌸🌸🌸🌸🌸🌸
माझं ही प्रेम आहे तुझ्यावर टाइमपास असं काही नाही..
लपवत नाही रे राज्याआता सांगते तुला सर्वकाही.
बावरे मन हे माझे..फक्त तुलाच शोधत राही..
लपवत नाही रे राज्याआता सांगते तुला सर्वकाही.
समजतंय रे तुझ्या भावना..मलाही आता करमत नाही..
लपवत नाही रे राज्याआता सांगते तुला सर्वकाही.
मित्र असतात अवतीभोवती..नजर मात्र तुलाच शोधात राही..
लपवत नाही रे राज्याआता सांगते तुला सर्वकाही.
तू दूर निघून गेलासकारण मात्र सांगितले नाहीस..
तुझ्याशिवाय हे वेडे मन कोणाचाही विचार करत नाही..
लपवत नाही रे राज्याआता सांगते तुला सर्वकाही.
विसरली नाही रे राज्या तुला शंका तू घेऊ नकोस काही..
अरे तुझ्या सुखासाठी मंदिरातदेवापुढे रोज मी फुले वाही..
लपवत नाही रे राज्याआता सांगते तुला सर्वकाही.
लपवत नाही रे राज्याआता सांगते तुला सर्वकाही.💞💕💞💕💞💕💞
-Sagar Rokade
🌸🌸🌸🌸🌸🌸
मी म्हणालो आरसा
वृत्त : मेनकालगावली : गालगागा गालगागा गालगा
जीवनाला मी म्हणालो आरसाआयुष्याला मी म्हणालो आरसा**चालताना हासते तू कायशीचालण्याला मी म्हणालो आरसा**चांदण्याच्या सोबतीला चांदणीया नभाला मी म्हणलो आरसा**प्रीत माझी लाजरीशी बासरीबासरीला मी म्हणालो आरसा**सांग माझ्या या मनाला चांगलेया मनाला मी म्हणलो आरसा**तू जराशी लाजरी का बावरीलाजण्याला मी म्हणालो आरसा**आवडीने या प्रकाशाला पहाया गझलेला मी म्हणालो आरसा**प्रकाश साळवीबदलापुर – ठाणे
🌸🌸🌸🌸🌸🌸
आज काल
होतो जसा काल मीआजही तसाच आहे |कालही एकटाच होतोमी आजही एकटाच आह ||
आज काल इथे आम्ही दोघच असतोमाझा एकांत आणि मी ,तासन तास दोघं बोलत बसतोआठवणींच्या विश्वात हरवत असतो…|आठवणीचे विश्वात तुला शोधता शोधतापापण्यात पाणी दाटून येते..||
शेवटी मनाला हेच समजावतो ,जीवन हे असच जगायचं असतंदुःख घेऊन सुख वाटायचं असतं ..जीवन – मरण हे फक्त कोड आहेजाता – जाता हे सोडवायचं आहे……|||
-Hardik D. Shah Mumbai
🌸🌸🌸🌸🌸🌸
तुला यायचे येऊन जा रे
तुला यायचे येऊन जा रेघरी आपल्या घेऊन जा रे सय येते कितीदा तरीपुन्हा एकदा भेटून जा रे फुले चार घेऊन जा तूजरा गंध तू देऊन जा रे फुलव मनाचा पिसारा रेजरा अंगणी नाचून जा रे बरसावे वाटते आज राणी मनाला जरासा भिजवून जा रे तमाच्या नभातून बाहेर तूप्रकाशास घेऊन तू जा रे
प्रकाश साळवी बदलापुर -ठाणे
🌸🌸🌸🌸🌸🌸