11+ आयुष्यावर लिहिलेल्या अप्रतिम कविता | Life poems in Marathi.
Life poems in Marathi: आयुष्य हे अनेक चढउतारांनी भरलेले आहे. सुख दुःखाच्या पावसात ते न्हाहून निघालेल आहे. आजपर्यंत अनेक कवी व कवयित्रीनी मानवी आयुष्यात दडलेले क्षणिक सुख व कधीही न संपणार दुःख आपल्या प्रखर शब्दातून मांडलेल आहे. आयुष्याचे धडे देणाऱ्या, मानवी सुखदुःखाचे वर्णन करणाऱ्या, आयुष्याचा खरा अर्थ सांगणाऱ्या कवितांचा अप्रतिम कवितासंग्रह खाली दिला आहे. तसं पाहिलं तर आयुष्यवर बोलण्यासारखं खूप काही आहे. जितक आपण आयुष्यवर बोलू तितकं कमीच पडणार आहे. आयुष्य शब्दाची व्याख्या मोजक्या शब्दात करता येऊ शकत नाही. आयुष्य या शब्दात खूप गूढ अर्थ दडलेला आहे. आजपर्यंत हजारो कवी कवयित्रींनी आयुष म्हणजे काय, ते कसं जगायचं, आयुष्य जगताना काय करायचं, याबद्दल बरंच काव्य त्यांच्या शब्दात, कवितांच्या माध्यमातून लाखो कविता रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
आयुष्य हे सप्तरंगी जरी असल तरी ते बेरंगी सुद्धा आहे. आयुष्यात ज्याप्रमाणे सुखाचे खळखळणारे झरे पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे आयुष्यात दुःखाचे डोंगर देखील पाहायला मिळतात. आपण आपल्या आयुष्याकडे ज्याप्रमाणे पाहतो, त्याप्रमाणे ते आपणास दिसते. आपण आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. आपण जर आपल्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं. तर आयुष्य आपणास सुखद पाहायला मिळेल. जर आपण आपल्या आयुष्याकडे निराशेने पाहिलं तर सगळीकडे आपणास दुःखच दिसेल.
चला तर मग Life poems in Marathi मध्ये पाहूया.
1.जीवन हे असंच असत
जीवन हे असंच असत,
खूप काही करायचं असत,
पण मनातल मनात राहून जात.
आयुष्य सांर धावपळीत जात,
शेवटी मात्र सगळ आठवत.
संसाराच्या मागे धावत धावत
शरीर आणि मन थकून जात,
आई वडिलांच्या मायेत
लहान पण सहज निघून जात.
मोठे झाल्यावर कळत,
सुख तेवढच होत वाटत.
2. आयुष्याचे संस्कार
टीका करण भागच बनलय,
माणसाच्या उभ्या जगण्याचा.
घडायचं नाय आणि घडू द्यायचं नाही,
संस्काराच जडलाय आयुष्याचा.
– दत्ता कोकरे
3. उजवे डावे
आयुष्याच्या वाटेवर चांगले वाईट अनुभव येत गेले,
काही चढ तर काही उतार, कधी ऊन तर कधी सावली,
कधी प्रेम तर कधी विरह.
वेळ प्रसंगी या सगळ्यांना अनुभवत
वास्तवाची झालर
आणि विश्वासाची किनार लावीत आले
सगळेच माणसं
इमानदार किंवा सदाचारी नसतात
कमी जास्त प्रमाणात
उजवेडावे
समाजात वावरत असतात
– माया दामोदर
4. आयुष्याची गत अशी
गत अशी आयुष्याची अशी
सुई आहे दोरा नाही
रंग बदलते आयुष्य
अंधार ठोकर देई
गळा दाबतो एकांत
दुःख पडता पदरी
मऊ मऊ गादीचाही
स्पर्श भासतो काटेरी
चाले विस्तवावरून
कळे वेदनांचा त्रास
फुकट नाहीत येत
पुढे सोनेरी दिवस
जीवनात येते रस्ते
कधी फुलांचे कधी काट्यांचे
संयम अनसंस्कार
सावरताना मोक्याचे
अजानपणी न कळे
व्यथा पडद्यामागची
बोल टोचते बोलूनि
दारे खोलली व्यथेची
मन धोरणे वेगळी
न सुटे आतली गाठ
डोळे उघडे ठेवून
चाल रे जीवनाची वाट
– मच्छिंद्रनाथ जगन्नाथ मेढे
5. आयुष्य चालताना
चिमुटभर दुखाने कोसळू नकोस,
आयुष्य चालताना मागे वळून बघू नकोस.
आले आयुष्यात अपयश जरी,
डाव मांडण सोडू नकोस.
जगन कठीण मरण सोप असत.
आपल्यांना एकट सोडून जाण बर नसत.
6. कठीण परीक्षा
जीवन एक कठीण परीक्षा आहे.
आशा हेच एक यश आहे
जीवनाच्या वाटेवर पुढे चालत राहाण
हीच एक आयुष्याची सुंदरता आहे.
स्वतासाठी जगण ते कसलं जगण
कधीतरी दुसऱ्यांसाठी जगायला शिकावे
अंधाऱ्या वाटेच्या मार्गावरील दीपक बनून
सर्वाना मार्ग दाखवणे शिकावे
ते जीवन पण काय जीवन आहे,
ज्यात आशेचा कण नाही
मार्गावर पुढे चालत राहणे तरी काय आहे,
जेव्हा आयुष्याच ध्येय मिळवण्यासाठी उत्साह नाही.
7. आयुष्य काय कामाचे
ते आकाश काय कामाच ज्यात तारेच नाहीत.
तो मार्गाच काय कामाचा ज्यावर दगड धोंडे नाहीत.
तो सूर्य काय कामाचा ज्यात उष्णताच नाही.
तो चंद्र काय कामाचा ज्यात शांतता नाही.
तो पाऊस काय कामाचा ज्यात वीज नाही.
ती बाग काय कामाची ज्यात हिरवळ नाही.
ती फांदी काय कामाची ज्यावर काटे नाहीत.
ते तथ्य काय कामाचे ज्यात संघर्ष नाही.
8. आयुष्याचा मार्ग
नदीच्या मार्गात दगड टाकले म्हणजे नदी वाहायची थांबत नाही,
परिस्थितीच्या धमकीने प्रयत्नवादी व्यक्तींची नजर झुकत नाही.
9. एक क्षण पराभवाचा
एक क्षण पराभवाचा
जीवन बदलू शकत नाही,
आहे काय असे जे तू आयुष्यात करू शकत नाहीस
10. जीवनाचे रहस्य
जीवनाचे रहस्य
जीवन किती वेगळ आहे,
प्रत्येक वाटेवर तिच्या धोखा आहे,
कधी दुखाचा डोंगर तर कधी सुखाचा वर्षाव
इथे प्रत्येक संध्याकाळ कोणी रंगीन पाहिली आहे
फक्त कागदाच्या तुकडयावर आयुष्य वाहील आहे.
11. आयुष्याचा निर्णय
उद्या ना आम्ही असू ना कोणती तक्रार,
फक्त एकत्र केलेल्या आठवणींचा सोहळा असेल.
जे क्षण आहेत आता ते आनंदाने जगूया,
काय माहित उद्या आयुष्याचा निर्णय काय असेल.
निष्कर्ष
Life poems in Marathi आमच्या या कविता संग्रह लेखात लिहिलेल्या कविता नक्कीच आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ठरतील अशी आहे. Life poems in Marathi या पोस्टमध्ये लिहिलेल्या कवितेतील शब्द प्रेरणा देणारे जीवनातील वास्तविकता दर्शवणारे, जीवन म्हणजे काय याचा अर्थ सांगणाऱ्या आहेत. या कविता संग्रहातील कविता कवी रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. या कविता आपणास आवडल्यास आल्या प्रिय व्यक्तीसोबत शेअर करा.