शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी / Good Night Quotes In Marathi 2025.
नमस्कार मित्रांनो,तुम्हाला दररोज रात्री न चुकता शुभ रात्री संदेश पाठवायची सवय आहे ना? असलीच पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या आवडता व्यक्तीला प्रत्येक माणूस सुंदर रात्रीचे आणि चांगल्या स्वप्नांचे संदेश पाठवत असतो. माझ्या मते असे केल्याने नाते अधिक घट्ट होते आणि आपले प्रेम जिव्हाळा समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचत असतो.
शुभ रात्री संदेश मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संदेश असतात जसे की काही विनोदी असतात, काही प्रेमाचे असतात, काही काळजी व्यक्त करणारे तर काही तुमचे टेन्शन कमी करणारे देखील असतात. या सर्व प्रकारचे संदेश आजच्या पोस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. मला आशा आहे की तुम्हाला ही सर्व शुभ रात्री संदेश नक्कीच आवडतील.
Good Night Quotes In Marathi.
हसरा चेहरा आणि शांत मन हीच जीवनाची खरी संपत्ती आहे. नेहमी आनंदी रहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवा. शुभ रात्री!
दिवसभरातील चांगल्या आठवणींना मनात जपून ठेवा, वाईट क्षणांना विसरून शांत झोपा. उद्याचा दिवस नवी आशा आणि ऊर्जा घेऊन येईल. शुभ रात्री!
काही लोक म्हणतात, चांगल्या लोकांना आठवून झोपायला गेलं की गोड झोप येते, माझं तर असं आहे, मी तुम्हाला आठवूनच झोपायला जातो. शुभ रात्री!
जीवन ही स्वप्नासारखे आहे, जे मिळाले ते आपले, आणि जे नाही मिळाले ते स्वप्न! शुभ रात्री!
“प्रेम” आणि “आदर” याचं खरं महत्त्व तेच जाणतात जे तुमच्या “मनाच्या भावना” समजू शकतात…! शुभ रात्री!
दिवसाच्या शेवटी आपल्या आत्मविश्वासाला अधिक मजबूत ठेवा, उद्या एक नवा आणि चांगला दिवस तुमचं स्वागत करेल. शुभ रात्री!
Good Night Message In Marathi.
भाषांचे अनुवाद होऊ शकतात, पण भावना समजून घ्याव्या लागतात, कारण त्या शब्दांपलीकडच्या असतात. शुभरात्री!
पैशाने प्रत्येक गोष्ट विकत घेता येते, पण खरे प्रेम आणि स्नेहानेच नाते जपता येते. मनापासून जोडलेले नातेच आयुष्य सुंदर बनवते. शुभ रात्री!
मला आकाशाला गवसणी घालायची इच्छा नाही, फक्त आपल्या माणसांच्या हृदयात स्थान मिळवायचं आहे, याहून जास्त काहीही नको आहे. शुभ रात्री!
मी वेळेला विचारले…
आजच्या काळात माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? वेळ हसून म्हणाली…
“माणसाची स्वतःची चांगुलपणा.”
कारण चांगुलपणा हा नेहमीच स्वार्थी जगाला खटकतो. पण तरीही चांगुलपणा कधीही सोडू नका, तोच आपली खरी ओळख आहे. शुभ रात्री!
Good Night Status In Marathi.
क्षणाक्षणातून निर्माण होतात भावना, भावनांमधून निर्माण होतो विश्वास, विश्वासातून जोडले जातात नाती, आणि नात्यांमधून तयार होतो कोणीतरी खास, आणि ते खास व्यक्ती म्हणजे तुम्हीच. शुभ रात्री!
प्रेमाचे नाते जपून ठेवा, मनाशी मन जोडून ठेवा, या जगातून काय घेऊन जाणार? गोड शब्दांनी नाती जपून ठेवा.
शुभ रात्री!
जे लोक आठवणीनं आपल्याला हसवतात, ते दूर असूनही आपल्या हृदयाच्या जवळ असतात. गुड नाईट! तुमची रात्र आनंदमय जावो!
या जगात मन:शांतीसारखी दुसरी कोणतीही मोठी संपत्ती नाही. शुभ रात्री!
नातं ते नसतं जे जगाला दाखवलं जातं, नातं ते असतं जे मनापासून निभवलं जातं. ‘आपलं’ म्हणण्यानं कोणी आपलं होत नाही, आपलं तेच असतं जे मनापासून स्वीकारलं जातं. शुभ रात्री!
येणारी सकाळ तुमच्यासाठी भरभरून आनंद घेऊन येवो! शुभ रात्री!
Good Night Wishes In Marathi.
ज्याच्याकडे काहीच नाही, त्याच्यावर दुनिया हसते, ज्याच्याकडे सर्वकाही आहे, त्याच्यावर दुनिया जळते, माझ्याकडे तुमच्यासारखे अनमोल नाते आहे… ज्याच्यासाठी दुनिया तरसते! शुभ रात्री!
ज्यांच्या मनात नेहमीच चांगुलपणा असतो, तेच लोक खऱ्या अर्थाने विशेष असतात, आणि तुम्ही त्यापैकीच एक आहात. शुभ रात्री!
तुमच्या जीवनाचा आनंदाचा दिवा नेहमीच तेवत राहो! जे सुख आज मिळाले, ते नेहमी मिळत राहो! शुभ रात्री!
अंतराची चिंता करू नका, मनापासून आमची आठवण काढा आणि आम्ही तुमच्याजवळ असू. फक्त डोळे मिटा आणि मनाने जवळ करा. गुड नाईट!
स्वप्नं पाहणं अगदी सहज असतं, पण ती पूर्ण करण्यातच मात्र संपूर्ण आयुष्य खर्च होतं. शुभ रात्री, गोड स्वप्नं!
ईश्वर तुमच्या सर्व गरजांची काळजी घेवो आणि तुमच्या जीवनात प्रेम, विश्वास, आणि शांतीचा आशीर्वाद देवो. बिछान्यावर आराम करा आणि शांत झोप घ्या! शुभ रात्री, गोड स्वप्नं पहा!
जाणवतंय सगळं, पण स्पर्श करता येत नाही, तुम्ही आमच्यासाठी फुलांच्या सुगंधासारखे आहात… शुभ रात्री!
जीवनात हरल्यानंतरच विजयाचा अर्थ कळतो. आज दुःख आहे, तर उद्या नक्कीच आनंद येईल. शुभ रात्री!
🌹 हे सुंदर फूल तुमच्यासाठी आहे, तुम्ही नेहमी आनंदी रहा आणि हसत राहा. शुभ रात्री!
जसे आकाशाला तार्यांची सोबत असते, तसेच खऱ्या मैत्रीत विश्वासाची ताकद असते. डोळ्यांच्या भावनेने पाहाल, तर आम्ही नेहमी तुमच्या जवळ असू. शुभ रात्री!
चांदणी रात्रीतली प्रत्येक तारा तुमच्या स्वप्नांना रंगवो, तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो, आणि नवीन दिवसात, तुमच्या सर्व दुःखांना दूर घेऊन जाओ. शुभ रात्री!
सुखी आयुष्यासाठी घर मोठं असण्यापेक्षा घरातील वातावरण आनंदी असणे महत्त्वाचे आहे. शुभ रात्री!
संबंध कोणताही असो, विचारांचे साम्यच प्रत्येक नात्याचा आधार असतो. शुभ रात्री!
साखरेचा भिती इतकी वाढली आहे की, लोकांनी गोड खाणं तर सोडलंच, पण गोड बोलणंही बंद केलं आहे. शुभ रात्री!
दिलाची मैफिल अशी असते की, झोपदेखील भावनांमध्ये हरवून जाते. कोणाला विसरून शांत झोपणं सोपं नसतं. गुड नाईट!
मैत्रीचे नाते कधी तुटू नये, हे देवा, चुका होण्याआधीच समजून घे, माझ्या चुकीमुळे माझं कोणतंही आपलं माझ्यावर रुसू नये. शुभ रात्री!
Good Night Sms In Marathi.
मित्रही तूच, आधारही तूच, हास्यही तूच, आणि आनंदही तूच, रागावतोस पण समजून घेतोस, माझ्या जीवनाच्या प्रवासात तूच आहेस खास. शुभ रात्री मित्रा!
या धावत्या जीवनात तीन गोष्टी कधीही सोडू नका…
१. सकारात्मक विचार
२. महान ध्येय
३. आपलं असं वाटणारं आपलेपणाचं नातं.
शुभ रात्री!
दुसऱ्यांसाठी उदाहरण सांगणे सोपे असते, पण स्वतः एक उदाहरण बनणे खूप कठीण असते. स्वतःला घडवा आणि आदर्श बना. शुभ रात्री!
रात्रीच्या शांततेत चंद्र आपल्याला सुरक्षीत ठेवो, स्वप्नांच्या गोडीने आपली मनं भरुन टाको, जगाच्या सर्व सुखाची काळजी घेणारा परमेश्वर, प्रत्येक दिवस आपल्याला आनंद देत जावो. शुभ रात्री!
Good Night Poem In Marathi
रात्र तर नेहमी वेळेवर येते, पण झोप मात्र बंडखोर झाली आहे, हल्ली ती येण्याचं नावच घेत नाही. शुभ रात्री!
प्रेम हे मनाचा भाव आहे, व्यवहार नाही… म्हणूनच ते प्रत्येकाशी होत नाही!
प्रेमाचे सौंदर्य त्याच्या निरपेक्षतेत आहे, ते जिथे मनापासून असते, तिथेच त्याची खरी ओळख होते. शुभ रात्री!
नात्यांपेक्षा मोठी भावना काहीच नाही, मैत्रीपेक्षा पवित्र इबादत काहीच नाही. ज्याला तुमच्यासारखा मित्र मिळाला, त्याला आयुष्याकडून दुसरे काही हवेच नाही. शुभ रात्री!
तुम्ही आम्हाला आठवलं नाहीत तरी चालेल, पण आम्हाला तुम्हाला आठवूनच झोपण्याची सवय आहे, तेही मनापासून आणि प्रेमाने. शुभ रात्री!
प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात नसते… पण आपल्या कारणामुळे कोणाला दुःख होऊ नये, हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे.
चांगल्या विचारांनी आणि नम्रतेने नाती जपली जातात. प्रयत्न करा की आपल्या वागणुकीतून फक्त आनंदच पसरवला जाईल.
शुभ रात्री!
शुभ रात्री
नमस्कार न केला तरीही आशीर्वादाचा वर्षाव करणाऱ्या जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे…
आपले आई-वडील!
आर्थिक आधारापेक्षा मानसिक आधार अधिक महत्वाचा असतो, कारण आर्थिक आधार दिलेली व्यक्ती एक वेळ विसरली जाईल, पण मानसिक आधार दिलेली व्यक्ती कधीच विसरता येणार नाही…
शुभ रात्री!
चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवा, कारण महाभारतासारखे विशाल युद्ध झाले, तरी श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावरचे हास्य कधीच मावळले नाही. जणू ते सांगत होते की, जीवन कितीही कठीण असो किंवा संकटे कितीही मोठी असो, त्यांना आनंदाने स्वीकारा आणि शांतपणे उपाय शोधा! म्हणूनच, नेहमी आनंदी राहा!
शुभ रात्री!
शेवटचा संदेश
मित्रांनो आजची शुभ रात्री संदेश पोस्ट तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या मित्र परिवाराबरोबर नक्की शेअर करा आणि तुमचे बहुमूल्य मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.