मराठी हृदयस्पर्शी कविता | Heart Touching Poem In Marathi.

मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आम्ही काही खास हृदयस्पर्शी कविता घेऊन आलो आहोत. तुम्ही तुमच्या भावना तुमच्या आवडत्या व्यक्ती बरोबर या खास कवितांच्या माध्यमातून व्यक्त करू शकतात. यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या भावनिक कविता पाहायला मिळतील. आम्हाला आशा आहे की या कविता तुम्हाला नक्कीच आवडतीन.

मराठी हृदयस्पर्शी कविता / Heart Touching Poem In Marathi.

Heart Touching Poem In Marathi

आयुष्याचं रहस्य समजून जगता आलं पाहिजे,मरण कधीही येऊ शकत, पण जगायला शिकता आलं पाहिजे, सुख तर प्रत्येकाला येतं, दुःख पचवता आलं पाहिजे.

रंग काळा का गोरा, हे नाही महत्त्वाचं, कर्तृत्वाच्या तेजानं स्वतःला उजळता आलं पाहिजे.

पाय जमिनीवर ठेवून उंच शिखर गाठता आलं पाहिजे, यशाच्या झगमगाटातही समाधान शोधता आलं पाहिजे.

पाप सोपं असतं, पण पुण्य उभं करता आलं पाहिजे, ताठ उभं राहणं सोपं, पण कधी झुकूनही वागता आलं पाहिजे.

जीवनात ठेच लागणारच, त्यात थोडं शिकता आलं पाहिजे, वेदनांवर मलमपट्टी करून पुन्हा उभं राहता आलं पाहिजे.

शहाणपणाचं ओझं न घेता, निरागसतेनं हसायला आलं पाहिजे, भलत्या प्रलोभनांना टाळून, आनंदाने जगता आलं पाहिजे.

Heart touching kavita in marathi.

heart touching kavita in marathi

लढाईत उणीव जाणवेलच, पण ती भरून काढता आलं पाहिजे, हास्याच्या गारव्याने अश्रू पुसून समाधान पेरता आलं पाहिजे.

आयुष्य सुंदर आहे, हे जाणून खुलं जगता आलं पाहिजे, प्रत्येक क्षणाला मिठीत घेऊन भरभरून हसता आलं पाहिजे.

प्रेम मिळालं तरी स्वीकारायची हिम्मत सगळ्यांत नसते, कधी परिस्थिती प्रेम करण्यालायक नसते, तर कधी नशिबाचीच साथ मिळत नाही. प्रेम देणं आणि प्रेम मिळवणं, या दोन्ही गोष्टी भाग्याचं लेणं असतात.
प्रेमाचा स्पर्श हळुवार असतो, त्याला जपायला शहाणपण लागतं. ज्याला प्रेम मिळतं, तो खरा धन्य, आणि ज्याला प्रेम देता येतं, तोही भाग्यवान.
जीवनाचं सार प्रेमात दडलं आहे, त्याला समजायला हृदय मोठं हवं आहे. प्रेमाचा क्षण अनुभवायला जो सज्ज, त्याचं आयुष्य खऱ्या अर्थानं समृद्ध आहे.

!! माझं तरी काय? !!

एकटाच आलो, एकटाच जाईन, मग कशाला या स्वप्नांचा पाईन? का धराव्या चुकीच्या वाटा, जीवघेणी ओझी, निरर्थक गाठा!

कुणी नेलं काही, त्यात काय माझं? ज्याचं होतं तेच घेतलं साजरं. नशिबाला त्याच्या दिलं ते फळ, आपलं म्हणत बसणं व्यर्थाचं गोड गुळ!

का उगी खंत करावी, जी कधीच नव्हती आपली? दुसऱ्याची होतीच ती संपत्ती सारी. माझं म्हणत फक्त जपलं, पण सत्य मात्र दूरच होत.

म्हणून सांगतो, सोडून दे ताण, आपलं असतं फक्त आत्मज्ञान. ज्या वाटेवर चालतोस, तीच खरी, बाकी सगळं क्षणभंगुर, रिकामीच आयुष्याची वाट!

दुःखाचं ओझं

सुखाच्या दारी, हातात दुःखाचं ओझं होतं, मनातल्या वेदनांना मी गुपचूप बांधत होतो. कुणीतरी येईल, फुंकर घालेल घावांवर, भांडणारे अश्रूही ठेवले होते नशिबावर.

भावनांची नाजूक रेशीम गाठ जपली होती, पण तीच आता जखमेची धार झाली होती. दुखावलेल्या भावनांना कितीदा मी जाळलं, त्या जळत्या राखेत मन माझं हरवलं.

नातं असावं, सोबत हसवणारं, नसावं कधीही हृदय पिळवटणारं. फक्त प्रेमाने जीव जपणारं, आयुष्यभर मनोमीलन टिकवणारं.

वेळ आली तर…

वेळ आली तर तुला शिकवीन, आयुष्य कसं रंगवायचं असतं, शब्दांच्या मागे धावून, स्वप्नं कशी सजवायची असतात. वाक्यांच्या गाठी बांधून, जीवनाचं गाणं गातं, अन् त्याच गाण्यात, मनाचं रेशीम पातं.

वेळ आली तर तुला सांगीन, मन जिंकण्याचं रहस्य, गुपित भावनांचं उलगडत, प्रेमाचं सत्य. आवडी-निवडी सांगताना, जुळवायचं कसं नातं, अन् त्या नात्यातच, मिळवायचं हवंहवंसं काहीतरी खास.

वेळ आली तर तुला शिकवीन, स्पर्शाचं कोमल गुपित, ओठांवर फिरणारं हळुवार चांदण्याचं आवरण. फुललेल्या भावना जपून, मिठीत साठवायचं, अन् त्या मिठीतच, जगणं शोधायचं.

वेळ आली तर तुला समजावीन, दुःख झिजवायचं कसं, अश्रूंच्या थेंबांनी नव्या सुरावटी बांधायच्या कशा. आयुष्याच्या पटलावर, सुखाचे रंग भरणं, अन् त्या रंगांमध्येच, स्वप्नांचा साज लावणं.

वेळ आली तर तुला दाखवीन, प्रेमाचं खरं रूप, विरहातही जपावं, आशेचं मूक स्वरूप. क्षितिजावर बघून, नवा सूर्य उगवायचा, अन् त्या प्रकाशात, आयुष्य खुलवायचं!

जीवनाची कथा

पारदर्शक काचेसारखी नाजूक असूनही ठाम आहेस तू,
शुद्ध निर्मळ मनाचा प्रसन्न प्रकाश आहेस तू.
प्रेमळ ओठांनी क्षणाक्षणाला जिंकतेस तू,
आणि अश्रूंच्या धारांनी कधी काळीज पिळवटतेस तू.

हसताना बेभान आनंदाची लहर देतेस तू,
तर दुःखाच्या सावल्यांनी काळजावर घाव करतेस तू.

तुला समजून घ्यायला किती संघर्ष करावा लागतो, अन् समजलो म्हणता म्हणता पुन्हा नवा सवाल टाकतेस तू.

जीवनाचं गूढ उलगडत चाललं असतं, पण पुन्हा नवी कोडी उभी करतेस तू. अजूनही पूर्ण उमगायचं बाकी आहे, तुझ्या प्रत्येक वळणावर नवं काही शिकवतेस तू.

तुला विसरण्याचा प्रयत्न

तुला आता ब्लॉकलिस्टमध्येही पाहायचं नाही,
तुझं अस्तित्वही आयुष्यात राहू द्यायचं नाही.
तुझं शेवटचं पाहिलेलं पाहून मन खचलंय,
तुझ्या आठवणींच्या सावल्यांमध्ये अडकून बसलयं.

तू शक्य असेल तर माझा नंबर काढून टाक,
मीही माझं जीवन नव्याने सुरळीत करू पाहीन.
नफरत झालीय आता तुझ्या नावाशी,
तुझा फोनही उचलायचा नाही, ठरवलंय मनाशी.

तुटलंय नातं, आता पुन्हा जोडायचं नाही,
जुन्या आठवणींना पुन्हा उघडायचं नाही.
तुला विसरण्यासाठी मनाशी घेतलंय ठाम,
आता माझं जीवन पुन्हा होईल सुखी आणि शांत.

मीच माझा उत्तर

मऊशार स्वप्नांचे रस्ते, चाललो तरी वाट खडतर,
कधी मीच झालो प्रश्न, कधी स्वतःलाच दिलं उत्तर.
वादळांचे तडाखे सोसताना काळीज माझं झिजत होतं,
सुख-दुःखाच्या या खेळात, मन थकून हरवत होतं.

घामाच्या धारांनी ओली झाली जीवनाची रेष,
कुठेच नव्हता जादूमंतर, फक्त संघर्षाची वेश.
पुन्हा मीच उभा राहिलो, पुन्हा दिला स्वतःला आधार,
कधी मीच माझा प्रश्न, कधी मीच उत्तराचा सार.

आज हिरवीगार झाली शेती, फुलांनी बहरले रान,
आवसेची काळोख रात्रही, दिव्याच्या तेजाने झाली तेजोमय आज.
जुन्या आठवणी बंद करून ठेवल्या, मनावर ठेवून भार,
कधी मीच माझा प्रश्न, कधी मीच उत्तराचा सार.

आता पुढे वाट चालताना, नव्या स्वप्नांची सोबत आहे,
प्रश्नांना उत्तर शोधण्यातच, आयुष्याचं खरेपण आहे.
संघर्षाला सामोरं जाणं हेच माझं मोठं शौर्य,
कधी मीच माझा प्रश्न, कधी मीच उत्तराचं सार!

आईचा त्याग

गरिबीची झळ तिनंही सोसली होती,
पायाला तिच्या कष्टांची भेग पडली होती.
दुःखाचं ओझं ती नेहमीच उचलत होती,
पण आईच्या डोळ्यातून अश्रू कधीच पाहिले नाही.

तिने दुःखांचा पसारा कधी मांडला नव्हता,
तिच्या वेदनांचा आवाजही कधी झळकला नव्हता.
हसून सावरत होती आयुष्याच्या वाटा,
लेकरासाठी तिनं भोगले अनेेक काटे.

स्वतःच्या वेदना लपवून तिनं घर सांभाळलं,
आईच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य पाहिलं.
त्यागाची मूर्ती, कष्टांची देवता होती,
तिच्या त्यागानेच घरात लक्ष्मी होती.

मी माझी खास

पावलोपावली चालले आयुष्याचे प्रवाह, कर्तव्यांच्या ओझ्याखाली झाकले मनातले हास्य.
सर्वांसाठी झुरत जगले, स्वतःला विसरले, थोडं स्वतःसाठीही जगणं कधी शिकले नाही.

सर्वांचे मन सांभाळून, दिला वेळ फक्त इतरांना, स्वतःसाठीच्या क्षणांना मात्र नेहमी टाळलं. जीवनाचा खेळ कधी संपेल, काही भरवसा नाही, स्वप्नांच्या मागे धावताना, थांबण्याची आली नाही वेळ.

प्रत्येक वळणावर सुख-दुःखाची वाट पाहते, क्षणोक्षणी नवा अनुभव देऊन जाते. कधी झेलले टाळ्यांचे आवाज, तर कधी मौनाचा भार, आयुष्याने दिलं तरीही, त्याच्यावर उरतो उधार.

मला नाही आशा कोणाकडून काही मिळण्याची, मीच आहे माझ्यासाठी, खास जगण्याची.
येडी-गबाळी दिसते कधी, तरीही मी अनोखी, माझ्या जगण्यासाठी मीच खास!

खरं प्रेम

प्रेमात एकमेकांना समजून घेता आलं पाहिजे, चुकांना माफ करून, नातं जपता आलं पाहिजे. चुका करून सोडून जाणारे खूप असतात, पण त्या प्रेमासोबत उभं राहणं महत्त्वाचं ठरतं.

प्रेमात स्वप्न तर खूप जण दाखवतात, ते स्वप्न सत्यात आणण्याचं सामर्थ्य हवं असतं. फक्त गोड शब्दांनी नातं उभं राहत नाही, त्याला सत्याच्या वाटेवर चालण्याचं बळ हवं असतं.

प्रेमात प्रामाणिक राहणं खूप महत्त्वाचं, धोका देणाऱ्यांची संख्या मोठीच असते. पण खरं प्रेम जपणारं, साक्षीदार होणं, जीवनभर नातं फुलवण्याचं कारण ठरतं.

नात्यांचा विसर

भाऊ काय, बहीण काय, नात्यांचा फक्त पसारा,कोण विचारतो कोणाला, हा प्रश्नच झाला मोठा!
कुणी कुणाकडे फिरकत नाही, कुणी जवळ येत नाही,जगलात काय, मेलात काय, मायेचा पत्ताच उरत नाही.

संवेदनशीलता आता हरवलीय कुठं तरी,
ओसरीवरच्या गप्पाही आता विसरल्या सारी.
सांजवेळी एकत्र येण्याचं सुख कुठेच नाही,
मनाशी माणुसकी हरवलीय, त्याचीच कहाणी.

पॅकेज, इनक्रिमेंट, सॅलरीचा खेळ सुरू आहे,
इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड यातच आयुष्य अडकून बसले आहे.
माणूस असूनही, माणूसपण हरवत चाललं,
अन् शेवटी या दुनियेचं The End होत आहे.

Leave a Comment