नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपल्या बहिणी साठी काही खास अश्या कविता आणि शायरी ज्या की तुम्ही बहिणीच्या वाढदिवसाला म्हणजेच Birthday साठी पण वापरू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे नक्की वापरायच म्हणजे नक्की काय करायच तर तुम्ही खाली bahinichya birthday sathi kavita स्टेटस म्हणून ठेऊ शकता किंवा जर तुम्ही Instagram वर Birthday ची पोस्ट किंवा स्टोरी टाकणार असाल तर तुम्ही बहीणी साठीचे captions म्हणून पण वापरू शकता.
आम्ही खाली अजून काही बहिणीसाठीच्या शायरी दिल्या आहेत. ज्या देखील तुम्ही तुम्ही बहिणीच्या birthday ला ठेऊ शकता. तसेच तुम्ही रक्षाबंधन ला देखील स्टेटस किंवा रक्षाबंधन शुभेच्छा संदेश म्हणून देखील वापरू शकता. आपल्या साठी एक सूचना आहे खालील सर्व कविता आम्ही वेगवेगळ्या साईट वरुण घेतल्या आहेत जरी तुम्हाला काही या विषयी तक्रार असेल तर आम्हाला 100poems.in@gmail.com वर करू शकता.
दीदी
जरी असला हा शब्द दोन अक्षरी
असे सोबत माझ्या निरंतअ री,
कसं सांगू किती आधार आहे तुझा
जणू पाठीचा कणा च तू माझा,
अर्थहीन जीवनाचा अर्थ च तू आहेस
तूजवीना तर मूळी हे जीवनच व्यर्थ आहे,
तूला दुःखात पाहवायची शक्ति मात्र माझ्यात नाही
परि आनंदात पाहता तूला मन मात्र भरभरून जाई
असता तू सोबत माझ्या सांग बरं मला उनिव कशाची
तुजपासूनी दूर कशी मी राहू, सांग ना गं ताई…
तुझं रडणं त्यावर माझं हसणं
हसून तुझे डोळे पुसण
तुझं रुसणं माझं मनवणं
तुझं पडणं माझं पाय खेचणं
एका लिपस्टिक झुमक्यासाठी
तुझी हांजी हांजी करणं
तुझ्या मागे मागे फिरणं
तुझ्या गुपितासाठी तुला
ब्लॅकमेल करणं तो दंगा,
ती मस्ती, ते प्रेम आज
सारं काही आठवणींच्या
कुपीत कैद तेव्हाची मोठे
होण्याचीच घाई आज
अंतरी सली मन आज
त्याच आठवणींचा पाठलाग करी
माझी बहिण मलाच हवी,
~Ganesh Gundal
पुढच्या सात जन्मात तीच हवी..
आवडत मला तीला त्रास देणं,
तिच्यापेक्षा मोठं असून शिव्या खाणं..
तिला त्रास देण्यात अलगच मजा असते,
ते सुख दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत नसते..
आठवण येते का ? असं विचारायला कुणी
असावी वाटतं मिस करतो का रे मला ?
असं बोलणारी कुणी असावी वाटतंमी किती ही इग्नोर केलं
तरी ही नातं तसच जपणारी असावी
वाटतं माझा प्रत्येक खोडीत
मला सांभाळून घेणारी कुणी असावी
वाटतं जिचा असण्याने वीट येईअन् नसण्यान जीव व्याकुळ होऊ
~Ganesh Gundal
असं वाटतं जिच्या विरहाने
मनाला गहिवरून जावसं वाटतं ,
तशी एक धाग्याने बांधुन ठेवणारी
बहीण असावस वाटतं…
हल्ली बालपणात एकत्र वाढलेल्या भावा-बहिणीतील निरागस प्रेम लोप पावताना दिसत आहे. बालपणासारखे भावाबहिणींचे नाते निर्मळ, वात्सल्यपूर्ण राहो, कुणाचीही दृष्ट या सुंदर नात्याला लागू नये एवढीच कामना🙏🙏😘😘😘
बालपणाचे गाव
बालपणी घ्यायचो वाटून एक चॉकलेट दोन्हीजण
रागावले तुला बाबा कधी उदास व्हायचे
माझे मन आता लागत नाही एकमेकांच्या मनाचा ठाव
कुठे हरवले आपले निष्पाप बालपणाचे गाव
एकाच मैदानावर आपण खेळायचो सुंदर खेळ
आता माञ बसत नाही आपल्या विचारांचा मेळ हरवलेली सलगी
आपली करते मनावर घाव कुठे हरवले
आपले निष्पाप बालपणाचे गाव
भांडलो जरी दिवसभर पुन्हा एकत्र यायचो
झाले गेले सारे क्षणात विसरून जायचो
सुन्या झालेल्या मैफिलीत कधी हजेरी लाव
कुठे हरवले आपले निष्पाप बालपणाचे गाव
कालसारखे आजही सजवू आई-बाबांचे घर उडून जाता
पक्षी येईल का त्याला जुनी सर चल सावरु नव्याने
आपला भावंडांचा डाव कुठे हरवले आपले निष्पाप बालपणाचे गाव
-प्रभाती बेनाडे,
नातं
चला आज एक नातं लिहु
उंदरा-मांजरीच्या नात्याला
आज थोड सविस्तर मांडु
बहिण-भावाच्या नात्यातीलउधारी तपासू आईने आणलेल्या
एका कॅडबरीच्या हिशोबाची
जरा मोजमाप काढू
भांडणातील का असेनाते प्रेम ही लिहू रक्षाबंधन-भाऊबीजच्या
गिफ्ट साठी थोड आपणही भांडू
बहिण-भावाच्या नात्याला आज नवीन
धाग्याने विणू शब्दांच्या पलीकडले
आपुलकीच्या भावनेत गुंतलेल्या
सुंदर अश्या उंदरा-मांजरीच
नातं आयुष्यभर जपु…
-शुभांग
जरी ती #मनातले भाव व्यक्त करत नसेल तरीही तिचे चेहऱ्यावरील भाव व्यक्त होतातच. कारण,त्याच्या जीवाचा तुकडा असते ना ती….
दोन मनांची अतूट गुंफण !
हिरा #भाऊ अन् #बहीण अंगठी अंगठीस हो सुरेख कोंदण !
मदतीस्तव वा संकटातही धावे बंधू करण्या रक्षण !
भावाचा बहिणीस आधार द्रौपदीसखा तो नारायण !
दुजाभाव ना मनांत कोठे दोघांचे ते एकच रिंगण !
मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप
काळजी रूपी धाक, प्रेमळ तिची हाक
कधी बचावाची ढाल तर
कधी मायेची उबदार शाल
भरलेलं आभाळ रितं कराया,
तिचीच ओंजळ पुढे येई,
जागा जननीची भरून काढाया
देवाने निर्मिली आईनंतर ताई
माझी बहीण मलाच हवी,
पुढच्या सात जन्मात
मला तीच हवी,
आवडतं मला तिला त्रास देणं,
तिच्यापेक्षा मोठं असूनही
तिच्याकडून मार खाणं,
तिला त्रास देण्याची मजा
जगातील इतर कोणत्याच गोष्टीत नाही.
भावाबहीणीचं नातं
नेहमीच घट्ट असतं
आयुष्य संपलं तरी
ते कधीच तुटत नसतं
तू माझी बहीण
मी तुझा भाऊ
प्रेमाचं आपलं नातं
आयुष्यभर अतूट ठेवू
माझ्या प्रत्येक आनंदात
मोठा वाटा तिचा असतो
माझ्या प्रत्येक अश्रूचा थेंब
माध्याआधी तिच्या डोळ्यात वाहतो
कधी चूक झाली तर
ताई माधी बाजू घेते
गोड गोड शब्द बोलून
शेवटी पाठीत फटका देते
पहिली आणि शेवटची
जीवाभावाची मैत्रीण माझी ताई
कितीही सांगा काही बाही
पण माझ्यावर तिचा विश्वास लय भारी
आपली ताई
तिला आहे खूपच घाई
प्रश्न काही विचारल्यावर
सांगले मला आता वेळ नाही
ताई शब्दातच आहे
माया प्रेमळ आईची
जन्मोजन्मी मज राहो
साथ माझ्या ताईची
तुला नकळत समजून काय समजायचं..
तुझ्यासारखी बहीण दिली म्हणून
देवाला हात का नाही जोडायच..
तू प्रत्येकाला भेटू दे असं का म्हणायचं..
तू माझ्याजवळ आहे मग तुला मीच जपायच…
कारण मला आयुष्यात प्रत्येक क्षणाला
तुझ्या सोबत राहायचं… #बहीण
भावाचे जगणे करते कठीण
तरीही पाठराखीन अशी ती
बहीण प्रत्येक गोष्टीत तिला
धाई उत्तम व्यवस्थापक माझी
ताई भावाला लुबाडून राहते
एकदम साधी दादागिरी करण्यात
पटाईत दीदी जीवाला जीव
देणारी लहान माई प्रेमळ
मस्तीखोर अशी मुक्ताई