नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फुलानवर मराठी कवींता ज्या तुम्हाला नक्की आवडतील तुम्ही आम्हाला या कविता कश्या वाटल्या हे नक्की कळवा.
दव फुलावरी
दव फुलावरी
दिसे रंगीले मोती
हळुवार वा-यासवे
मस्त झोके घेती…
प्रभाते रविकिरणाने
चमचम चमकती
चमकत हसणे
गीत जीवनाचे गाती…
फुले मस्त फुलली
हिरवी हिरवी पाती
अलगद निखळणे
थरथरणा-या पात्यावरती…
दवबिंदूचे पडणे
कधी न ते दिसे
क्षणिक सहवास
क्षणभंगूर जसे…
सुर्यदर्शन घेऊन
जमिनीत जिरावे
नवअंकूर फुटूण
फुलांसाठी मिळावे…
श्री सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
पळस फुले बहरली
हिरव्या मोठ्या पानांत
पळस फुले बहरली
निसर्गपण नटला
पानांत वाटे काढली रांगोळी
पानांची द्रोण,पत्रावली
जेवन पंक्तीसाठी उपयुक्त
निर्मळ झ-याचे पाणी
पानांवाटे पांथस्त घेई मुखात
लाल लाल फुले
शोभीवंत रानात
जसा देखना पाहुणा
आला असे गावात
ह्याच्या बहरण्याने
पाऊल पडे वसंत ऋतूचे
अमराईच्या वनात
कुहूकुहू गाणे कोकिळेचे
सृष्टी नटली फुला फळांनी
हिरवा पदर घऊनी
हिरवी किनार पळसाची
लाल लाल साडी नेसूनी
श्री सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
– सुनीता गोरे / कविता /
गुलाब फुलाचा रंग गुलाबी ।
जणू हा प्रेम संदेश पसरवी ।।
भाग्य तयाचे बलवान ।
फुलांचा राजा शोभतो छान ।।१।।
सोनचाफा कनक कांती ।
पाकळ्या फुलती लंबाकृती ।।
मोहक सुवास अवती भवती ।
आपुलकीचा संदेश देती ।।२।।
लपून बसला हिरवा चाफा ।
फणा उगारुनी सांगे जनाला ।।
धुंद सुगंध धन-लक्षमीचा ।
सन्मान करावा मांगल्याचा ।।३।।
प्रफुल्ल असते सदाफुली ।
सदा सर्वदा राहा समाधानी ।।
शुभ्र रंगाचा मोगरा फुलला ।
पाकळ्यांनी विद्या विभूषित झाला ।।४।।
शुभशकुनी अशी अबोली ।
रंग केशरी साजिरी गोजिरी ।।
देवचाफा अंगणी पसरला ।
सर्वांच्या मनी आनंद भरला ।।५।।
इवली इवली फुले बकुळीची ।
मंद-मधुर सुवासाची ।।
नाजूक काली जशी उमलली ।
शांतीदूत बनुनी सदनी आली ।।६।।
अशी ही जाई-जुई चमेली ।
सौख्य-सुमने घेऊन आली ।।
रात्रीच्यावेळी रातराणी ।
मार्ग दाखवीत दरवळत आली ।।७।।
पिवळी पिवळी शेवंती ।
करी सकलजनांची उन्नती ।।
विविधरंगी कृष्णकमळ ।
सुवासाने मन होई निर्मळ ।।८।।
चिखलात उमलले कमळ ।
पंख पसरले शुभ धवल ।।
पद्मनाभास प्रिय असे ।
समृद्धी जणू त्यांत वसे ।।९।।
लाल रंगाची जास्वंदी
गणरायाची आवडती
असे ती बुद्धीदाती
संकट समयी विघ्नहर्त्ती ।।१०।।
तुमच्या कविता पाठवा
कवि मित्रांनो तुम्ही आम्हाला तुमच्या कविता पाठऊ शकता त्या कविता आम्ही आमच्या या ब्लॉग वर पोस्ट करू. तुम्ही आम्हाला तुमच्या कविता ईमेल द्वारे पथू शकता किंवा आम्हाला कमेन्ट करू शकता.आमचा ईमेल id Marathicharoli.in@gmail.com असा आहे.