शिक्षक एक आधार ..
शिक्षक एक अधांग सागरातील दीपस्तंभ…
शिक्षक मानव रूपातील देव…..
शिक्षक हा जणू परीसच बनवी जीवन सोनेरी…..
शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच
ज्याच्या फांदी फांदीमधुनी सळसळत
बेदरकारपणे ज्ञानाची पानं
त्याच्याच छायेखाली लाभते सौख्य…
अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या
अस्फुट चित्रकाराला किंवा त्याच्याच रेषेखाली
अधांतरी लटकलेली असतात
कित्येक भावनांच्या
डोहात भिजून नतमस्तक झालेली
चेहऱ्याची निरागस अक्षरे..
शिक्षक असतो ज्ञानाचा दिवा…..
अंधारलेल्या जीवनात दिसते वाट
देण्या सारखं नाही माझ्याकडे..
आर्पितो तुमच्या चरणी जीवन माझे
-ADITYA ZINAGE